Latest Marathi News
Ganesh J GIF

शुर्पनखावरुन आता काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरणार

रेणुका चौधरी मोदींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार, मोदींच्या अडचणी वाढणार?

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठेवल्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी या मानहानीच्या गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे मोदींच्या चिंता वाढल्या आहेत.

रेणुका चौधरी यांनी मोदींची एक जुनी व्हिडिओ क्लिप टि्वटवरुन शेअर केली आहे. चौधरी यांनी २०१८ मधील संसदेतील एका व्हिडिओचा आधार घेत मोदींच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेणुका चौधरी यांना अप्रत्यक्षपणे शुर्पणखा म्हणून संबोधले होते. आता हाच मुद्दा पकडून काँग्रेसने मोदींना घेरले आहे. कोणतेही शिष्टाचार नसलेल्या अतिमहत्वाकांक्षेने ग्रासलेल्या माणसाने मला सभागृहात शुर्पणखा म्हटले. आता न्यायालय किती तत्परतेने हालचाली करते ते पाहू, असे रेणुका चौधरी यांनी म्हटले आहे. मोदींच्या या कमेंटनंतर त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. मोदींनी या कमेंटसाठी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने तेव्हा केली होती.  दरम्यान राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज सांयकाळी विरोधी पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसकडून आज संसद भवन ते विजय चौक दरम्यान मोदी सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. एकंदरीत काँग्रेसकडून संपूर्ण देशभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची तयारी केली आहे. रेणुका चौधरी यांच्या या ट्विटवर टिप्पणी करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘हो रेणुका जी तुम्ही आजच त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करा. तुम्ही खूप वाट पाहिली आहे’.

रेणुका यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यावर कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही युजर्सचं म्हणणं आहे की, मोदी यांनी यात कुठेही ‘शूर्पणखा’ असं म्हटलेलं नाही. तसेच संसदेत एखादं वाक्य बोललं असेल तर त्यासाठी न्यायालयात जाता येत नाही, असा दावा काहींनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!