Just another WordPress site

भाजीत मीठ जास्त झाल्याने आचा-याचा केला खून

पुण्यातील धक्कादायक प्रकार, ढाबा चालकाचे निर्दयी कृत्य

पुणे दि ९(प्रतिनिधी)- जेवणामध्ये मीठ जास्त झाले म्हणून हॉटेल चालकाने भावाच्या मदतीने आचाऱ्याचा खून केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे.या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा चालक ओंकार केंद्रे आणि त्याचा भाऊ कैलास केंद्रे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

GIF Advt

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव इथे चाकण रोडवर एक धाबा आहे. या ढाब्यावर प्रोसेंजीत गोराई नावाचा परप्रांतीय कामगार आचारी म्हणून काम करत होता. जेवणात मीठ जास्त झाले म्हणून ढाबा मालक ओंकार केंद्रे आणि त्याचा लहान भाऊ कैलास केंद्रे यांनी आचाऱ्याच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाकडी दांडके, लोखंडी रोड व वायरने मारहाण करून जीवे ठार मारून टाकले. ही घटना २६ ऑक्टोबरला घडली होती.तसेच खुनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे त्या मृतदेहाची डोंगराळ भागात नेऊन विल्हेवाट लावली. तसेच धाब्यावरील इतर कामगारांना तोंड गप्प ठेवण्याची धमकी दिली होती. पण पोलिसांनी वेषांतर करून या ढाब्यावर भेट देत घटनेची माहिती घेतली. यानंतर दोघा भावांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस चौकशीत त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिलं. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. कुठलाही सबळ पुरावा नसताना पोलिसांनी या घटनेचा शिताफीने तपास करत घडलेला प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणाचा अधिक तपास चाकण पोलिस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!