Latest Marathi News

एका तरूणीने भर चाैकात केली तिघींची बेदम धुलाई

व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, एकजण पडली तिघींवर भारी

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- तरुणांची रस्त्यावर मारमारी झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण आता मुली देखील यात मागे नाहीत अलीकडे मुलींचे रस्त्यावर राडे करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे .असाच तरुणींच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.यात मुलींनी फ्री स्टाईल मारामारी केली आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही पण काही तरुणी चौकातच अचानक भांडु लागल्या, हे पाहून आसपासचे लोक हैराण झाले.यात एक तरुणी स्वतःचा बचाव करत इतर तीन मुलींवर आलटून – पालटून बेदम मारहाण करते. एक मुलगा मध्यस्थी करायला येतो, पण एक मुलगी स्वतःची सुटका करून घेते आणि तीन मुलींवर हल्ला करण्यास सुरुवात करते. नंतर तिन्ही मुली तिला मारण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होत नाही. हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी रेकॉर्ड करून अपलोड केला होता, त्यानंतर तो व्हायरल झाला. @DAILIFGHTS4U नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ४४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये मुली एकमेकांशी जुने वैर असल्यासारख्या भांडत आहेत. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!