Just another WordPress site

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाहून तो झाला वेडापीसा

अनोख्या भेटीतील त्या फोटोचा किस्सा सोशल मिडीयावर व्हायरल, नेटकरी म्हणाले...

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यापासून दोघेही अनेक कार्यक्रमात एकत्र दिसून येतात विरोधकांनी यावर काहीवेळा टिका केली असली तरी दोघेही आज देखिल अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

GIF Advt

नुकतेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी ताज हाॅटेलला आले होते. त्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात असे दिसत आहे की, एक व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहून फोटो काढून घेण्यासाठी कमालीचा उतावीळ झाला होता. तो समोरच्या व्यक्तीला रागातच फोटो काढण्यासाठी बजावत होता. अखेर त्याची चिडचिड ओळखत काढतो तो काढतो फोटो म्हणत समजावले त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी देखील त्या व्यक्तीबरोबर फोटो काढत त्याला शांत होण्यास सांगितले. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ शेअर करताना नेटक-यांनी कॅप्शनमध्ये , ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोसयटी अचिव्हर्स अवॉर्ड्स द्या.’ अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचं नाट्य झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. राज्यातील एक प्रकल्प असो किंवा निर्णय असो हे दोघे एकत्र दिसतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!