नांदेड दि १४(प्रतिनिधी)- आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’ रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे. शिवराज क्यातमवार आणि धारा मोरे असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दोघांची जात वेगळी होती. त्याशिवाय त्यांच्या प्रेमाबद्दल घरच्यांना काहीच माहिती नव्हती जर घरच्यांना या प्रेमाबद्दल कळाले तर विरोध होईल अशी भीती दोघांनाही होती. या भीतीतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भोकर स्थानकसजवळ नंदीग्राम एक्सप्रेस येताच त्यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीसचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.
अपघातात दोघांच्या मृतदेहाचे तुकडे झालेले होते. मृतदेह शासकिय रुग्णालय भोकर येथे आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.