Latest Marathi News

जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर केला शेअर

प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते! रोमान्सचा व्हिडीओ शेअर केल्याने जोडपे होतेय ट्रोल

मुंबई दि ७(प्रतिनिधी)-  लग्न ही आपल्या आयुष्यातील खाजगी गोष्ट आहे. त्याचबरोबर लग्नानंतर येणारी पहिली रात्र ही फक्त त्या पती पत्नीची असते. पण आजकाल प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अनेकजण नको ते कृत्य करत असतात सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यात एका जोडप्याने आपला हनिमुचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

         आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. पण एका जोडप्याने कमालच केली आहे. त्यांनी आपले खाजगी क्षण सार्वजनिक केले आहेत. arushirahulofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका दांपत्याने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जोडपे आपल्या रुममध्ये दिसत आहे. दोघांनी लग्नातील कपडे घातलेले आहेत. यावेळी नववधू आपले दागिने काढत असल्याचे व्हिडीओ दिसत आहे. यावेळी पती तिला दागिने काढण्यास मदत करत आहे. त्याचवेळी तो तिला मिठी मारत असताना पत्नीही त्याला मदत करत आहे. पण त्यांनी आणखी कहर करत एकमेकांचे चुंबन देखील घेतले आहे. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. त्यांनी जोडप्याला खडे बोल सुनावले आहेत काहींनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी इतक्या खालच्या स्तराला जाण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.तर काहींनी याच्या पुढचाही व्हिडिओ पोस्ट कर असे म्हणत फिरकी घेतली आहे.

                             सध्या युग हे सोशल मीडियाचं युग आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ शूट करत ट्रेंडिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण काहीजण प्रसिद्धीसाठी नको ते कृत्य करतात त्यामुळे त्यांना ट्रोल व्हावे लागते सध्या हे जोडपे सोशल मिडीयावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!