Latest Marathi News

पुण्यातील महाविकास आघाडीचे हे १९ नगरसेवक भाजपाच्या वाटेवर?

भाजपाच्या दाव्याने खळबळ, काँग्रेसचे माजी मंत्रीही भाजपाच्या गळाला?

पुणे दि ७(प्रतिनिधी)-  विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच, या निवडणुकांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एका निर्णयामुळे पुणे शहरातील एक बडा नेता भाजपात जाण्याच्या तयारीत आहे यामुळे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असताना मुळीक यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसमध्ये माजी नगरसेवक रशीद शेख यांच्या प्रवेशानंतर माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण शेख पक्षात आल्यानंतर धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना आणि आणि अदानी विरोधातील आंदोलनात त्यांचा सहभाग दिसून आला नाही. रमेश बागवेंच्या आधी अविनाश बागवे नाराज आहेत, त्यातच भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अविनाश बागवे हेच नाही तर महाविकास आघाडीतील 18 ते 19 नगरसेवक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हणत मोठा गाैप्यस्फोट केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याचा दावा मुळीक यांनी केला आहे. त्यामुळे इतर नगरसेवक कोण असा प्रश्न विचारला जात आहे. पण योग्य वेळ आली की बाकीचे नावं देखील सांगू. असे म्हणत भाजपाने सस्पेन्स वाढवला आहे. पण भाजपाने आता महापालिका निवडणूकीची तयारी सुरु केल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याने बागवे कुटुंबीयांची नाराजी दूर झाली असल्याची माहिती शहर काँग्रेसने दिली आहे.

विरोधकांनी टिळक कुटुंब नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. कसबा पोटनिवडणूक नियोजनाची बैठकीत कुणाल आणि शैलेश टिळक यांनी सहभाग घेऊन पक्षाला पाठिंबा दिला आहे. असा दावा करतानाच महाविकास आघाडीच्या हातात काही नाही, याची जाणीव नगरसेवकांना आहे. त्यांना मोदी आणि फडणवीस यांचीच गरज लागत आहे. असे म्हणत महाविकास आघाडीला डिवचले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!