Latest Marathi News
Ganesh J GIF

या क्रिकेटपटूला पत्नीला द्यावी लागणार ‘इतकी’ पोटगी

न्यायालयाचा महत्वाचा आदेश, 'इतक्या' लाखाची पोटगी देण्याचे आदेश

कोलकत्ता दि २४(प्रतिनिधी)- क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कोलकाता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्याला कोर्टानं पत्नी हसीन जहाँला दर महा १ लाख ३० हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आनंदिता गांगुली यांनी हे आदेश दिले आहेत.ही रक्कम शमीला प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला देण्याचे आदेश आहेत.


हसीन जहाँ मागील काही वर्षांपासून शमीपासून वेगळे राहाते. २०१८मध्ये हसीन जहाँने १० लाख रुपये मासिक पोटगीची मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती. हसीन जहाँने याचिकेत म्हटले होते की, तिला वैयक्तिक खर्चासाठी ७ लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा ३ लाख रुपये पोटगी हवी आहे. त्यावर निर्णय देताना कोर्टाने हसीन जहाँला ५० हजार रुपये मासिक पोटगी द्यावी लागणार आहे. तर मुलीच्या खर्चासाठी दर महिन्याला ८० हजार द्यावे लागणार आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, मॅच फिक्सिंग, हुंडाबळी असे गंभीर आरोप केले होते. तेंव्हापासून दोघे वेगळे राहत आहेत. महत्वाचे म्हणजे या निर्णयावर हसीन जहा नाराज असून ती या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहे.


मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ हे दोघे २०१४ रोजी लग्नबंधनात अडकले. शमीची पत्नी हसीन जहाँ ही एक अभिनेत्री आहे. दोघांनाही एक मुलगी आहे, पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. सध्या हसीन जहाँ तिच्या मुलीसह वेगळे राहात असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!