Just another WordPress site

प्रेमी जोडप्याचा कारच्या सनरुफमधील रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल

नियमांना पायदळी तुडवत प्रेमी जोडपे सैराट, पोलीस उगारणार कारवाईचा बडगा

लखनऊ दि २४(प्रतिनिधी)- आजकाल तरुण तरुणी सार्वजनिक ठिकाणी सर्रास चाळे करताना आढळत आहेत. काही दिवसापुर्वी लखनऊत एक जोडपे स्कुटीवर अश्लील चाळे करताना आढळले होते. तोच आता पुन्हा एकदा लखनऊत कारचा सनरुफ उघडून रोमान्स करण्याचा प्रकार समोर आला आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये लोहिया रोडवर सनरूफ उघडून आलिशान कारवर एक कपल रोमान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या गळ्यात हात घालून आणि किस करत होते. कारमागे असणाऱ्या एका व्यक्तीने या दोघांच्या वागण्याचा व्हिडीओ बनवला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनीही याची दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. या मार्गावरील सीसीटीव्ही तपासून कारवाई करणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. वाहनाच्या नंबरच्या आधारे मालकाचा शोध घेतला जात आहे, लवकरच आरोपींचा शोध घेऊन मोटार वाहन कायद्याच्या उल्लंघनाखाली कारवाई केली जाईल.अशीही माहिती पोलीसांनी दिली आहे. पण सध्या तरी या कपलच्या रोमान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

GIF Advt

लखनऊची संस्कृती अशी कधीच नव्हती, मोठ्या घरातील लोकच असे वागत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. आधी स्कुटी आणि आता कार रोनान्सची जोरदार चर्चा लखनऊ आणि परिसरात होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!