Latest Marathi News
Ganesh J GIF

अर्थसंकल्पावर शिंदे गटातील आमदाराची टीका

नाराजी व्यक्त करत माफीची मागणी, मोदींना लिहिणार पत्र

मुंबई दि १(प्रतिनिधी)- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. पण माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी अर्थसंकल्प इंग्रजीतून सादर केल्यावरून नाराजी व्यक्त केली. तर सत्ताधारी गडाच्या काही आमदारांनी अर्थसंकल्प न वाचताच तो शेतक-यांच्या कल्याणाचा असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. याची जोरदार चर्चा रंगली आहे.

बच्चू कडु यांनी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, “अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला गेला, ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. कुसुमाग्रज म्हणायचे, ‘भाषा मरत असली की देशही मरत असतो.’ आपल्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. जी भाषा बोलणाऱ्यांनी तुम्हाला निवडून दिले, ती भाषा तुम्ही सभागृहात बोलले पाहिजे. जेणेकरून देशातील सामान्य माणसाला ती भाषा, तो अर्थसंकल्प समजला पाहिजे. म्हणून पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा हिंदीतून सादर झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी या देशाच्या संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. हिंदी बोलणाऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करा. नाहीतर माफी मागून इंग्रजी बोला. कारण आम्ही राष्ट्रप्रेमी लोक आहोत. त्यामुळे लोकसभेमध्ये झालेल्या प्रकाराची सुधारणा झाली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. शिंदे समर्थक आमदाराकडून अशी प्रतिक्रिया आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अर्थसंकल्पातील तरतूदीवर बोलताना कडू म्हणाले की, “केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी समाधानकारक आहेत. पण यामध्ये कोट्यवधी शेतकरी, बेघर, मजूर सुटले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम होईल, असे या यातून वाटत नाही. या सर्व गोष्टींचा विचार अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे होता,” असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!