Just another WordPress site

कोयता गँगला पकडा पुणे पोलीसांकडुन बक्षीस मिळवा

कोयता गँगला पकडण्यासाठी पोलीस घेणार नागरिकांची मदत, बघा किती मिळणार बक्षीस

पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यातल्या विविध भागात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीसांनी आता नागरिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. यासाठी पुणे पोलीसांकडून बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.

GIF Advt

पुणे पोलीसांनी जो कुणी कोयता गँगच्या आरोपीला पकडून आणेल त्याला रोख रक्कम देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास तीन हजारांचं बक्षीस देण्यात येणार आहे. तर पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या आरोपीला १० हजार तर फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही १० हजारांचं बक्षीस देण्यात येईल. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास ५ हजारांचे बक्षीस पुणे पोलीसांकडून देण्यात येणार आहे. कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणे पोलिसांची झोप उडाली आहे. गर्दीच्या ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करणारे कोयता गँगचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


दरम्यान येरवड्याच्या बालसुधारगृहातून सोमवारी मध्यरात्री कोयता टोळीतील ७ सदस्य सुधारगृहातून पळून गेले आहेत.सिनेस्टाईलनं भिंतींना शिडी लावत ते फरार झाले. त्यामुळे  वैतागलेल्या पुणे पोलीसांनी आता नागरिकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्याला प्रतिसाद मिळणार का हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!