Latest Marathi News
Ganesh J GIF

माढ्यात भाजपाकडुन धैर्यशील मोहिते पाटील लढवणार लोकसभा निवडणुक

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पत्ता कट होणार?, मोहिते पाटलांशी हा पंगा घेतल्याने खासदार निंबाळकर अडचणीत?

माढा दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात लोकसभेचे मैदान आत्तापासूनच तापण्यास सुरूवात झाली आहे. कारण अनेक मात्तबर यावेळेस लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यातच माढा लोकसभा मतदारसंघ हा महायुती सोबतच महाविकास आघाडीसाठी देखील महत्वाचा आहे. पण आता माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपातील संघर्ष उफाळून आला आहे. यामुळे भाजपातील वरिष्ठ नेत्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक सचिव धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आगामी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील येथून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. महत्वाचे म्हणजे मागील काही वर्षापासून निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. कारण मोहिते पाटील विरोधक असणाऱ्या दोन आमदार शिंदे बंधूकडे निंबाळकर यांनी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे मोहिते पाटील दुखावले आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांना माननारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून, भाजपच्या तिकिटावर आगामी माढा लोकसभा निवडणूक आपणच लढविणार आहोत. कार्यकर्ते आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. असे मोहिते पाटील म्हणाले आहेत. मोहिते पाटील हे कधीही राजकीय विरोधकांना जाहीरपणे आव्हान – प्रतिआव्हान देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण मोक्याच्या क्षणी ते आपल्या विरोधकांची कोंडी करतात. त्यामुळे लोकसभा निवडणूक तोंडावर येताच आपले नाव पुढे करत त्यांनी विद्यमान खासदार निंबाळकर यांची कोंडी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘आमचे ठरलंय… खासदारच’ अशा स्वरूपाच्या पोस्ट करत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी याबाबत आग्रह धरला होता. महत्वाचे म्हणजे २०१९ च्या लोकसभा मतदारसंघातील माळशिरस मतदारसंघातून मोहिते पाटलांनी सव्वा लाखाचे मताधिक्य दिले होते. त्यामुळे निंबाळकर यांचा विजय सुकर झाला होता. पण आता ते इच्छूक असल्यामुळे भाजप माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सुवर्णमध्य काढणार का? आणि कसा काढणार याकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

२०१९ मध्ये सभा निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सर्व कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार निंबाळकर यांनी वरिष्ठांकडे मोहिते पाटील यांच्याविरोधात तक्रारी केल्यामुळे मोहिते पाटीलच आता निंबाळकर यांना आव्हान देणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!