
प्रेमात धोका! तरूणीचा भर रस्त्यावर जोरदार राडा
तरुणीच्या राड्याचा व्हिडीओ व्हायरल,लोकांना शिविगाळ करत मारहाण
ग्वालेर दि २८(प्रतिनिधी)- प्रेमात धोका मिळाल्यानंतर अनेकजण आपले दुख लपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात, पण मध्यप्रदेश मधील एका युवतीने ब्रेकअप झाल्यानंतर चक्क रस्त्यावर गोंधळ घातला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मध्यप्रदेश राज्यातील ग्वालेर शहरातील. एका मुलीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मुलगी रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. ब्रेकअपच्या दुखामुळे ती पूर्णतः अवाक्याबाहेर गेली आहे. ग्वाल्हेरच्या फूलबाग चौकात या तरूणीने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करत ती चक्क चालत्या कारच्या बोनेटवर चढली तसेच एका नागरिकाकडून त्याची बाईक हिसकावून घेतली.तिने कार मालकाला चपराकही मारली. काही जणांनी तरूणीला रोखण्याचाही प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न असफल झाल्यानंतर तिला थांबवण्यासाठी थेट पोलिसांना बोलवावे लागले. हा सर्व गोंधळ सुरु असताना तरुणीला तिच्या प्रियकराने फसवलं आहे. असं ती सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सुशील कुमार यांनी २७ मार्च रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता? त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – ग्वाल्हेरमधील मुलीचा हाय व्होल्टेज ड्रामा. दरम्यान पोलिसांनी तरुणीला नेल्यानंतर या प्रकरणी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतो आहे.
ग्वालियर
युवती का हाइवोल्टेज ड्रामा.
फूल बाग चौराहा पर एक युवती ने किया हंगामा
युवती ने एक घंटे तक हंगामा कर उत्पात मचाया
युवती ने एक कार सवार के साथ मारपीट की
बुजुर्ग की एक्टिवा छुड़ाकर खुद बैठकर चलाने लगी
युवती ने सड़क पर लगे पुलिस के बैरिकेट्स उठा कर फेंक दिए pic.twitter.com/pue5cJdnaQ— Sushil Kaushik (@SushilKaushikMP) March 27, 2023
प्रेमात खूप ताकत असते. व्यक्ती प्रेमासाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतात. काही जण तर प्रेमात चंद्र, तारे तोडून आणण्याच्या गोष्टी देखील करतात. पण त्यात ब्रेकअप झाल्यास ते काय करतील याचा नेम राहिला नसल्याचे समोर आले आहे.