जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याने भावाचा डाॅक्टरवर हल्ला
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद, डाॅक्टर जखमी गुन्हा दाखल
सांगली दि २८(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील मिरज सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केल्याने रुग्णाच्या भावाने डॉक्टरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विनोद गोटे या रुग्णाचा भाऊ संदीप गोटेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मिरज शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात अतिदक्षता विभागात रविवारी विनोद ज्ञानबा गोटे यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. पण डाॅक्टरांनी गोटे यांना तपासून मृत घोषित केले. भावाला मृत घोषित केल्याने संदीप गोटे हा संतापला. आणि त्याने डाॅक्टर कदम यांच्या अंगावर धावून जात ‘तू पेशंटला पाहिले आहेस का’ असे विचारत त्यांचा गळा दाबून मागे ढकलले.या घटनेत डॉ. विजय कदम यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याबद्दल संदीप गोटे याच्याविरुद्ध गांधी चौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.
जीवंत रुग्णाला केलं मृत घोषित; संतापाने रुग्णाच्या भावाने डॉक्टरवर केला हल्ला pic.twitter.com/xDcsa8gLgQ
— Ruchika (@Ruchika66964659) March 28, 2023
डॉक्टरवर हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आणणारी घटना पालघर जिल्ह्यात समोर आली होती. उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपी पुरुष आरोग्य सेवकाकडून चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच मुलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.