Latest Marathi News
Ganesh J GIF

वर्धा शहरात पेट्रोलपंपवार दिवसाढवळ्या दरोडा

दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, हाॅटेल व पानशाॅपवरही दरोडा, दहशतीचे वातावरण

वर्धा दि २७(प्रतिनिधी)- राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वर्ध्यात पाच ते सात जणांच्या टोळक्याने तोडफोड करत पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

वर्धा शहरात सहा ते सात जणांच्या टोळक्याने पेट्रोल पंपावर तोडफोड करत दरोडा टाकला आहे. या पंपाच्या तरूणांनी हातात काठ्या, तलवार आणि राॅड घेऊन हल्ला चढवला होता. यावेळी त्या टोळक्याने पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांना मारहाण करण्याबरोबरच पंपाची देखील तोडफोड केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी हाॅटेल आणि पान शाॅपीवर देखील हल्ला चढवत रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या घडला आहे. हा सगळा दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पेट्रोल पंपावर दाखल होत तातडीने तपासचक्र फिरविली. अवघ्या काही वेळातच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आले आहे.

वर्धा शहरातील या घटनेने काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. धक्कादायक म्हणजे तोडफोड करणाऱ्यांमध्ये एकूण सहा युवक आणि एका तरुणीचा समावेश आहे. या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!