ही फेमस अभिनेत्री दुसऱ्यांदा करणार लग्न
पहिल्या धक्क्यातुन सावरत घेतला लग्नाचा निर्णय, चाहत्यांमध्ये उत्सुकता, म्हणाली तुम्ही त्या प्रेमास...
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री वाहबिझ दोराबजी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पहिल्या पतीपासुन वेगळे झाल्यानंतर तब्बल चार चर्चांनंतर अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने लग्नावर भाष्य केले आहे.
‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकेमुळे एकत्र आलेल्या वाहबिज आणि अभिनेता विवियन दसेना यांनी २०१३ च्या सुरुवातीला लग्न केले होते. पण २०१७ मध्ये त्यांच्यात वाद होऊ लागल्यावर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. २०१९ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यावेळी वाहबीज म्हणाली होती की, मी आणि व्हिव्हियनने परस्परसंमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या आयुष्यातील तो अध्याय संपला आहे. आनंद आणि शांततेने भरलेली एक नवी सुरुवात आमची वाट पाहत आहे. मी व्हिव्हियनलाही शुभेच्छा देते.” पण आता चार वर्षानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणाली “मी प्रेमाला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे. हा माझा हक्क आहे.’ २०१३ मध्ये तिने अभिनेता विवियन डिसेनासोबत लग्नगाठ बांधली. ते लग्नानंतर ४ वर्षांतच वेगळे झाले, परंतु घटस्फोट त्यांच्यासाठी खूप वेदनादायक होता. पण आता मी दुसरं लग्न करणार आहे आणि ते लवकरच होणार आहे, पणयाविषयी आत्ताच काही सांगता येणार नाही.’ अशी पुस्तीही तिने जोडली आहे. आता तिचा होणारा सोलमेट कोण याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
घटस्फोटानंतर वाहबीज खुपच आजारी होती तिला मधुमेह देखील झाला होता. पण ती सामान्य जीवन जगत आहे. वाहबीजच्या करिअर विषयी बोलायचे झाल्यास ‘प्यार की ये एक कहानी’ आणि ‘बहू हमारी रजनी कांत’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘हिकअप्स अँड हुकअप्स’ या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.