Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिनेता सलमान खानला ३० एप्रिलला जीवे मारण्याची धमकी

सलमानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या, सुरक्षेसाठी सलमानने घेतली बुलेटप्रुफ कार

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- बॉलिवूडचा अभिनेताव सलमान खानला अलीकडच्या काळात ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ  करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता ३० एप्रिलला ठार मारले जाणार असल्याची धमकीचा कॉल काल मुंबई पोलिस कंट्रोल रूम मध्ये आला. त्यानंतर धमकी देणाऱ्या अल्पवयीन तरुणाला अटक करण्यात आली आहे.

सलमान खान गेल्या काही दिवासांपासून धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता एका १६ वर्षीय मुलाने त्याला धमकीचा फोन केला आहे. त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ३० एप्रिलला तो सलमान खानला मारणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याने रॉकी भाई अशी स्वत:ची ओळख सांगितली असून तो मुळचा राजस्थानमधील जोधपूरचा रहिवासी आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि सलमानला मारण्याची धमकी दिली होती. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सलमान खानला याआधी लॉरेन्स बिश्नोई गॅंगने धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. स्वत:च्या संरक्षणासाठी त्याने परदेशातून बुलेटप्रुफ गाडीदेखील मागवली आहे. त्याला धमकीचा मेल आल्यानंतर त्याने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी गॅंगस्टार गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पत्रकार परिषदेत सलमान खानला विचारण्यात आले की, “तुम्ही संपूर्ण भारताचे भाईजान आहात, तुम्हाला धमक्या मिळतात…यावर बोलताना सलमान म्हणाला की, ‘मैं सब का भाई नहीं हूं, किसी का भाई हूं और किसी की जान भी हूं. असे म्हणतच सलमानने आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!