
ही अभिनेत्री तीन वर्षानंतर बाॅलीवूडमध्ये करणार कमबॅक
म्हणाली 'मी घाबरले असं वाटलं का?' अभिनेत्री झाली ट्रोल, त्या अभिनेत्याची आठवण
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपूर्वी फारच चर्चेत होती. कारण अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणी तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. पण आता तब्बल ३ वर्षांनंतर रिया ग्लॅमरच्या दुनियेत पुनरागमन करत आहे. एमटीव्ही रोडीज या कार्यक्रमातुन ती पुनरागमन करणार आहे.
लवकरच एमटीव्ही रोडीजचा १९ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रिन्स नरुला आणि गौतम गुलाटी यांच्यानंतर या टोळीचा तिसरा म्होरक्या समोर आला आहे. या कार्यक्रमाचा रिया चक्रवर्तीचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रियाची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. यामध्ये ती आव्हान देताना दिसत आहे.‘तुम्हाला काय वाटलं, मी परत येणार नाही.आता घाबरण्याची वेळ दुसऱ्याची आहे.’ अशा शब्दात ती आव्हान देत आहे. पण रियाच्या समावेशामुळे काहींनी निर्मात्यांना ट्रोल केले आहे. रोडीजला वादग्रस्त बनवण्यासाठी रियाला गँग लीडर बनवण्यात आल्याचं यूजर्सचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे तिच्या चाहत्यांच्या आनंद झाला असुन शो सुरु होण्याची ते वाट पाहत आहेत. रियाने याआधी केलेल्या सर्वच चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना तिची फारशी चांगली भूमिका पाहायला मिळाली नाहीये. सुशांतच्या वादानंतर तिचा एक ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ती देखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग होती पण तिचे सीन्स खूपच कमी होते. हा चित्रपट बर्याच दिवसांपासून बनत होता आणि अमिताभ बच्चन सोबत इमरान हाश्मी देखील होता.
रोडीजच्या नव्या सीझनसाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या शोसाठी प्रेक्षक आतुर आहेत. ‘रोडीज १८’मध्ये आशीष आणि नंदिनीमध्ये चांगलीच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ‘रोडीज’च्या इतिहासात पहिल्यांदाच दोन विजेते घोषित करण्यात आले. नंदिनी आणि आशीष जिंकल्यानंतर त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये, ट्रॉफी अन् काही खास भेटवस्तू देण्यात आल्या होत्या.