Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मिडीयावर स्टार महिला पोलीस अधिकारीला अटक

या कारणामुळे पोलीसांनी ठोकल्या बेड्या, सोशल मिडीयावर आहे तुफान फेमस

जयपूर दि ७(प्रतिनिधी)- राजस्थान पोलिसांची उपनिरीक्षक नयना केनवाल कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते, पण आता नयनाला हरियाणाच्या रोहतकमध्ये अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केल्यानंतर नयनाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नैना केनवाल ही मुळची हरियाणाची आहे. ती आधी कुस्तीपटू होती, हरियाणामध्ये सरकारी नोकरी न मिळाल्याने ती राजस्थानमध्ये खेळू लागली. सध्या तिच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. वाँटेड गुन्हेगार सुमित नंदल याचा तपास करत असताना नयना पोलीसांच्या हाती लागली. पोलिसांनी नयनाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. नयनाने सांगितले की, ती दीड वर्षांपासून सुमितच्या संपर्कात होती.पण समोरच्या या कृत्याची आपल्याला काहीच माहिती नव्हती असे तिने सांगितले आहे. नैना 7 वेळा हरियाणा केसरी ठरली होती. तसेच ती राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही दिसली होती. पण आता तिला जेलची हवा खावी लागली आहे.

नैनाचा जन्म २ फेब्रुवारी १९९६ रोजी हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सुताना गावात झाला. तिचे आई आणि वडील दोन्ही गावचे सरपंच राहिलेले आहेत. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर नैना कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर नैनाचे लाखो फॉलोअर्स आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!