Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला लाचेची ऑफर देत धमकी

महिलेसह एकावर गुन्हा दाखल, १ कोटीची लाच, काय आहे प्रकरण?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केली आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका डिझायनर महिलेसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनिष्का असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचं नाव आहे. अमृता फडणवीस यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला डिझायनर असल्याने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. संबंधित आरोपी महिला अमृता यांच्या जवळपास १६ महिने संपर्कात होती. आणि तिने फडणवीस यांच्या निवासस्थानी अनेकवेळा भेट दिली होती. एका गुन्ह्यात आम्हाला मदत करा अशी त्याबदल्यात तुम्हाला १ कोटी रुपये देऊ, अशी ऑफर महिलेसह तिच्या वडिलांनी दिली होती. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणाकडे सुरूवातीला दुर्लक्ष केलं. मात्र, तरीही आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी त्यांना फोन तसेच मॅसेज करणे सुरूच ठेवले. अनिक्षाकाने त्यांना १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अज्ञात फोन नंबरवरून अनेक मेसेज पाठवले होती. अनिक्षा आणि तिचे वडील आपल्याविरोधात अप्रत्यक्षपणे कट रचत होते आणि आपल्याला धमकी देत असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

अनिक्षा या डिझायनरसोबत तिच्या वडिलांविरोधात फडणवीस यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (बी) (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कलम ८ भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्ग वापरण्याशी संबंधित आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!