Latest Marathi News
Ganesh J GIF

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला तरुणांची बेदम मारहाण

मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?

नांदेड दि ११(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील बजरंगनगर येथे झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरीबॉयला बेदम मारहाण करण्यात आली आहे. होळीच्या दिवशी ही घटना घडलीय. या मारहाणीचा सीसीटीव्हीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमरान तांबोळी असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरान होळीच्या दिवशी बजरंगनगर येथे पार्सल देण्यासाठी गेला होता. पार्सल देऊन तो पैसे घेण्यासाठी थांबला असता रंगाने माखलेले चार तरुण आले आणि त्यांनी अमरानला मारहाण करण्यास सुरूवात केली. या तरुणांनी अमरानला आधी लाथा-बुक्यांनी आणि काठीने मारहाण केली. यानतंर या युवकांनी दगडफेक देखील केली. त्यात अमरान गंभीर जखमी झाला आहे. त्याच दिवशी सायंकाळी त्याने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर पाच दिवसांनी विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. तर इतर तिघांचा शोध पोलिस घेत आहेत. अमरान म्हणाला की, बिलिंग करत असताना चार लोकं तिथं आले. टीशर्ट काढ म्हणून मला मारहाण करण्यात आली. ज्यांच्या घरी डिलिव्हरी दिली त्यांनी मला मदत केली. प्रकृती बरी नसल्याने तीन दिवसांपासून घराबाहेर पडलो नाही. असे अमरान म्हणाला आहे. मलस का मारहाण केली हे माहित नसल्याचे तो म्हणाला आहे.

 

यासंदर्भात पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे म्हणाले, सात मार्च रोजी ही घटना घडली. झोमाटाचा एक कर्मचारी अमरान बजरंगनगरमध्ये आर्डर देण्यासाठी गेला होता. होळी असल्याने तीन-चार अज्ञात व्यक्तींनी त्याला मारहाण केली. सर्व आरोपींची नाव माहीत झाली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!