Latest Marathi News
Ganesh J GIF

ट्रोल करणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे ओपन चॅलेंज

व्हिडिओ शेअर करत केले आवाहन, बघा त्या नेमके काय म्हणाल्या...

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकताच त्यांचा ‘आज मैंने मूड बना लिया ए ए ए , तेरे नाल ही नचना वे’ या त्यांच्या गाण्यावर डान्स करत एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या गाण्याला लोकांकडून मोठी पसंती मिळत आहे. तर काहीजण त्यांना ट्रोल करत आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी एक ओपन चॅलेंज दिले आहे.


अमृता फडणवीस यांचे ६ जानेवारीला ‘आज मै मूड बणा लेया’ हे गाणे प्रदर्शित झाले. गाणे प्रदर्शित होताच काही क्षणात त्यांच्या गाण्याची चर्चा सुरु झालेली असतानाच अमृता फडणवीसांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अमृता फडणवीसांनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. अमृता फडणवीस व्हिडीओमध्ये ‘आज मै मूड बणा लेया’ गाण्यावर हुकअप स्टेप करताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक चॅलेंज दिले आहे. त्यांनी चाहत्यांना या गाण्यावर स्वत: रिल बनवण्याचे आवाहन केले आहे. तसेच रिल बनवल्यानंतर गाण्याचे हॅशटॅग वापरुन व्हिडीओ अपलोड करण्यास सांगितलं आहे. अमृता फडणवीस यांचा हटके अंदाज एकीकडे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे त्यांना ट्रोल केलं जात आहे. पण अमृता फडणवीस मात्र गाणे गातच राहणार असे सांगत असतात.

दरम्यान गाण्याच्या लॉंचिंगच्या वेळी अमृता यांना देवेंद्रजींना तुमचे गाणे पाहिले का? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, पाहिलं. आणि त्यांना हे गाणं खूप आवडल्याचंही त्यांनी सांगितलं. देवेंद्रजींना मुळात गाण्यांची आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ते गाणी ऐकत असतात. त्यांना माझी गाणी नेहमीच आवडतात. तसंच हे देखील आवडलं. या गाण्यात तुझा एक वेगळा पैलू दिसतो, असंही त्यांनी मला सांगितल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!