Just another WordPress site

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी?

भाजपाकडून आगामी निवडणूकांची तयारी सुरु

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- देशातील सर्वात मोठा पक्ष असणा-या भाजपात महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले जाणार आहेत.महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्याने आता भाजप महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची पुन्हा आशिष शेलार यांची तर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड निश्चित मानली जात आहे. आमदर संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरु पक्षश्रेष्ठींकडून केला जात आहे.

GIF Advt

चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.भाजपात एक व्यक्ती एक पद धोरण असल्यामुळे पाटील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्याने मुंबई भाजप अध्यक्ष पदासाठी आशिष शेलार यांना पसंती असल्याचं बोलंल जातंय. २०१७ च्या निवडणुका शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. तेंव्हा भाजपाने आजवरच्या सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर होत्या. तर भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी भाजप ओबीसी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.त्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. पण एैनवेळी बदल होऊन संजय कुठे यांना देखील जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.


भाजपच्या नियमानुसार मंत्रिपद असलेल्या नेत्याकडे पक्षातील मोठं पद दिलं जात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रताप लोढा मंत्रिमंडळात असल्याने संघटनेत नवे बदल होऊ शकतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!