Latest Marathi News
Ganesh J GIF

 …तर शिंदे गट व भाजपाला बसणार पराभवाचा धक्का

'या' दाव्यामुळे महाविकास आघाडीचा उत्साह वाढला

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढवणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. जर लोकसभेच्या आगामी निवडणुका आज झाल्या तर भाजप-शिंदे गटाला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला संपवून शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकहाती जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. मात्र,सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या तर भाजप शिंदे गटाला धक्का बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला आहे. जर लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रातून यूपीएला ३० आणि एनडीएला फक्त १८ जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. शिंदे गट-भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसणार असल्याचा अंदाज आहे. १ ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर एनडीएला ५४३ पैकी ३०७ जागा मिळाल्या असत्या. तसेच युपीएला १२५ आणि इतर पक्षांना १११ जागा मिळाल्या असत्या. बिहारच्या सत्तांतरानंतर मात्र हे चित्र बदललं आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपच्या २१ जागा कमी होत आहेत. नव्या आकडेवारीनुदार महाराष्ट्रात शिंदे गट केवळ तीन ते चार जागा जिंकण्याची शक्यता आहे तर भाजप १४ ते १५ जागा जिंकू शकतो उद्धव ठाकरे यांची शिवसेना १३ ते १४ जागा जिंकण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ७ ते ८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंत सर्वोत्तम पंतप्रधान आहेत असेही सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.पीएम मोदी हे उत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं ४४ टक्के लोकांचं मत आहे. मात्र, पंतप्रधानपदीच्या दावेदारासाठी अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हेही आता शर्यतीत असल्याने अनेक नवे प्रयोग राष्ट्रीय राजकारणात होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!