Latest Marathi News

देवेंद्र फडणवीस युपीचे उपमुख्यमंत्री

मुंबई दि ७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेला सुरुंग लावून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेरीस भाजप सरकार आणून दाखवले आहे.पण, भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. पण, आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री नसून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा अफलातून शोध गुगलने लावला आहे.

गुगलवर जेव्हा एका राजकीय नेता, अभिनेत्याची माहिती सर्च केली जाते तेव्हा त्याच्या लोकप्रियतेनुसार, त्याच्या पदासह गुगलकडून प्रोफाईल तयार केलेली असते. उजव्या कोपऱ्यामध्ये फडणवीस यांचा फोटो आणि त्याखाली पद लिहिले आहे. पण, ते उपमुख्यमंत्री उत्तरप्रदेश असा उल्लेख आहे. आता फडणवीस हे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, मग उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री कधी झाले, असा सवाल उपस्थितीत झाला. याच प्रोफाईल खाली फडणवीस यांची विकिपीडिया आहे, यामध्ये मात्र ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे नेमकं गुगलला झालंय काय?असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

याआधीही गुगलकडून बऱ्याच चुका झालेल्या आहे. कधी भारताचा मॅप चुकीचा दाखवला आहे. तरी कधी कुणाचे नाव चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे गुगल सगळंच काही खरेच सांगत असेल याचा विचार करण्याची वेळ आलू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!