Latest Marathi News
Ganesh J GIF

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे एकनाथ शिंदेंनाच राज्यात ठेवावे

शिंदे गटातील आमदाराचे वादग्रस्त विधान, महायुतीत वादाची ठिणगी, भाजपाचा शिंदे गटाला क्षमतेचा सल्ला, युती तुटणार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. पण आता शिंदे गटाकडून भाजपावर बिचरी टिका करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे भाजपाकडुन संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा होताना दिसत आहे.

आमदार संजय शिरसाठ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जाहीरपणे वादग्रस्त विधान केले आहे. . ‘देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि एकनाथ शिंदे यांनाच राज्यात ठेवावे’, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी केले आहे. त्यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने संताप व्यक्त केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या समनव्य समितीच्या बैठीकित शिरसाठ यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. पण यामुळे महायुतीत कलगीतूरा रंगला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, ”देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रमध्ये रहावं, हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही. त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायचं की राज्यात रहायचं हे ते ठरवतील.” असे सांगत शिरसाट यांना टोला लगावला आहे. दरम्यान अनेक वेळा भाजपा नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याएैवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच आहेत असे जाहीर विधान देखील अनेक भाजप नेत्यांनी केली आहेत. पण आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी फडणवीसांनी दिल्लीत जावे असे वक्तव्य केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. मुहूर्त निघणार असे सांगत असताना अनेकांना वेळा त्याला हुलकावणी मिळाली आहे. त्यामुळे मंत्रीपदाची आस असणारे संजय शिरसाट नाराज आहेत. त्यामुळे ते सातत्याने आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. आता मात्र त्यांचे मंत्रीपद हुकण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!