Latest Marathi News
Ganesh J GIF

माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी देणार होते

करुणा मुंडे यांचा मोठा गाैप्यस्फोट, धनंजय मुंडे यांना हे लोक मुली पुरवत असल्याचा दावा, राजश्री मुंडेबाबत म्हणाल्या...

मुंबई – माजी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी असल्याच्या दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांनी आज न्यायालयात धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचे पुरावे सादर केले आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राजश्री मुंडेबाबत खुलासा केला आहे.

आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोटगीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान आज करुणा मुंडे यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या, ‘मला हिरोईनची ऑफर होती. पण मी नवऱ्यासोबतच राहिले. मला प्रेमाच्या जाळ्यात ओडून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी देणार होते,” असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्याचबरोबर माझा पती धनंजय मुंडे आणि त्याचे दलाल राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर हे सगळे दलाल लोक, जो मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटी रुपये देणार आहेत,” असा खळबळजनक आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. मीच धनंजय मुंडेंची १९९६ पासूनची पहिली बायको असल्याचा दावा केला. “माझ्याकडे पुरावे आहेत. धनंजय मुंडे मला सोबत घेऊन जगभर फिरले आहेत. कारण त्यांचं माझ्यावर प्रेम होतं. तुम्ही त्यांचे पासपोर्ट बघा. माझे व्हिसा लावलेले आहेत. आम्ही अनेक देशांमध्ये फिरुन आलो आहोत. राजश्रीच्या कोणत्याच कर्जात धनंजय गँरेंटर नाही. पण माझ्या कर्जात आहे. राजश्रीसोबत धनंजय मुंडेंसोबत जॉईंट अकाऊंट नाही. पण माझ्यासोबत आहे,” असे करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. न्यायालयाने पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. दोन लाख रुपये पोटगी करुणा मुंडे यांना मिळणार आहे. आता करुणा मुंडे पोटगी वाढवून घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. तसेच धनंजय मुंडे या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

करुणा मुंडे यांनी लग्नाचे सर्टिफिकेट माझ्याकडे जरी नसलं तरी ते राजश्री मुंडे यांच्याकडे देखील नाही’, असा दावा केला आहे. कारण त्याकाळात लग्नाचे सर्टिफिकेट होत नव्हते. मात्र, माझ्याकडे इतर पुरावे आहेत आणि ते मी लवकरच कोर्टात सादर करेन”, असे करुणा मुंडे यांनी म्हंटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!