Latest Marathi News
Ganesh J GIF

पोलिस भरतीच्या सरावाला गेली पण परतलीच नाही

सरावासाठी गेलेली मुलगी गायब, पोलिसात तक्रार दाखल, शिवानी गेली कुठे?

सातारा दि ८(प्रतिनिधी)- माण तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या तोंडले- डांगेवाडी गावातील शिवानी श्रीमंत डांगे ही पोलीस भरतीच्या व्यायाम सरावासाठी जाते, असं घरी सांगून गेली. मात्र, ती पुन्हा घरी आलीच नसल्याने गावात एकच गोंधळ उडाला आहे.

याबाबत माहिती अशी की, सध्या सर्वत्र पोलीस, सैन्य भरतीमुळे गावोगावी मुले-मुली अकॅडमीच्या माध्यमातून व्यायामाचा सराव करण्यात मग्न आहेत. शिवानी डांगे ही दहिवडी येथील एका अकॅडमीमध्ये सराव करत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस भरतीत तिने सहभाग घेतला होता. मात्र, तिची निवड न झाल्याने ती पुन्हा सरावाला लागली होती. सराव करत असताना तिच्यासोबत मैत्रीणीदेखील असायच्या. रोज व्यायाम करून सात वाजता घरी यायच्या, पण शुक्रवारी पहाटे नियमितपणे ती सरावाला जाते, अस सांगून गेली अन परत घरी आलीच नाही. त्यामुळे घरातील लोकांनी सरावाला जाणाऱ्या परिसरात तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे मुलीचा चुलत भाऊ विशाल किसन डांगे याने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये शिवानी हरवल्याची तक्रार दिली आहे.

अंगामध्ये निळा शर्ट काळी पॅन्ट काळे बूट असा वेश आहे. कोणाच्या निदर्शनास आली, तर तात्काळ दहिवडी पोलीस ठाणेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे. पण ती अचानक गेली कुठे? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!