Latest Marathi News
Ganesh J GIF

ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरताय का? ही बातमी पहाच

राज्य निवडणूक आयोगाकडून एक बदल, पहा उमेदवारासाठी नवे आदेश

मुंबई दि १(प्रतिनिधी)- विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे ही मुभा देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणूकीत अर्ज भरण्याची शेवटची मुदत २ डिसेंबर आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यातील सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने २ डिसेंबर २०२२ पर्यंत सायंकाळी ५:३० पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे. अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी देण्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला   विनंती केली होती. राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी  इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट पंचायत महाराष्ट्र इलेक्शन महाराष्ट्र  डॉट गव्हरमेंट डॉट इन’ चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला होता. त्यात मुदत संपत आल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली होती. त्यामुळे आॅफलाईन अर्ज भरण्याची परवानगी मागण्यात आली होती. अखेर ही मागणी मान्य केली आहे. आता उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!