Latest Marathi News
Ganesh J GIF

इचलकरंजीत चोरट्यांनी बॅगेतील कॅशवर मारला डल्ला

चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलीसांसमोर तपासाचे आव्हान

इचलकरंजी दि १(प्रतिनिधी)- सांगलीतील चोरीप्रमानेच आता इचलकरंजी येथेही चोरी झाली आहे. गाडीतील जवळपास दीड लाखापेक्षा जास्तीची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी एकाच प्रकारे झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या चोरांनी दहशत निर्माण झाली आहे. चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. सध्या पोलिसांकडून चोरांचा शोध घेतला जात आहे.

इचलकरंजी शहरात मोपेड गाडीमध्ये १ लाख ६० हजाराचा रोकड अद्यात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना वारणा बँक शाखा इचलकरंजी शेजारील गणपती मंदिराजवळ मंगळवारी दुपारी घडली आहे. याबाबतची माहिती पाडूरंग दुर्वे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रांत कार्यालय चौक परिसरात वारणा बँकेची शाखा असून बँके शेजारी गणपती मंदिर आहे. या मंदिरालगत पार्किंगमध्ये शशील दूर्व यांनी आपली गाडी उभी केली होती. गाडीच्या डीग्गीतून चोरट्यांनी पिशवीमध्ये ठेवलेली १ लाख ६० हजार रोकड चोरली. ही बाब लक्षात येताच दूर्व यांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधत घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांनी दिली. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

 

काही दिवसापुर्वी तिथेच असणाऱ्या एका बँके जवळ एका
महिलेच्या हातातील पैशाची पिशवी गाडीवरून हिसका मारून चोरली होती. सध्या शहरातील सेफसिटी अंतर्गत बसवण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळ निर्माण होत आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गात व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!