Just another WordPress site

‘इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन’

शिंदे गटाच्या बांगर यांचे फडणवीसांच्या खात्याला चॅलेंज, व्हिडिओ व्हायरल

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. पण यामुळे नेहमी वादात सापडणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला.

कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज कापण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे संतोष बांगर संतापले आणि त्यांनी दमदाटी केली. महावितरणचे कर्मचारी थकीत बिलामुळे लाईन तोडण्यासाठी तगादा लावत असल्याचे प्रकरण आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले होते. यावर आमदार बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आहे. इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन, असा इशारा बांगर यांनी दिला.
मतदार संघातील प्रश्नावर संतोष बांगर नेहमी आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानाखाली लावल्याने यावर जोरदार राजकीय चर्चा रंगल्या होत्या.

GIF Advt

हिंगोली, कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणाने चर्चेत असतात. मागच्या महिन्यात आमदार बांगर अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने जोरदार चर्चेत आले होते. विशेष म्हणजे फडणवीस यांच्याकडे असणा-या उर्जा विभागाच्याविरोधात बांगर आक्रमक झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!