Latest Marathi News
Ganesh J GIF

वाढलेल्या वजनामुळे या अभिनेत्रीला घरचेही मारायचे टोमणे

वजन कमी करत दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का, आज चित्रपटसृष्टीत बनवली वेगळी ओळख

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलीवूड चित्रपटांवरही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या भाड्याने तिने अनेकांना भुरळ घातली आहे. पण नुकताच तिने एक मोठा खुलासा केला आहे.

मध्यंतरी पूजाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिचं टोपणनाव काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तिने मोकळेपणाने उत्तर दिले. पूजाला लहान असताना घरातील लोक बोजा असं म्हणायचे. पूजाचा जन्म वाडिया हॉस्पिटलमध्ये झाला. जन्माच्यावेळी तिचं वजन साडेदहा पाऊंड होतं. विशेष म्हणजे त्या वर्षातील सर्वात हेल्दी बाळ म्हणून तिचा रेकॉर्ड आहे. विशेष म्हणजे जन्मानंतर तिचं वजन वाढतच गेलं. वाढत्या वजनामुळे ती जड झाली होती. म्हणून तिला कोणीही उचलून घ्यायचं नाही. त्यावेळी ‘हा काय बोजा आहे, असं माझा मामा आईला म्हणाला होता. तेव्हापासून सगळेच बोजा म्हणायचे. पण,आता ते नाव बोजा वरुन बोजू असं झालं आहे’, असं पूजा म्हणाली. दरम्यान पुजाचे नाव आत्तापर्यंत भूषण प्रधान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वैभव तत्ववादी यांच्याबरोबर जोडण्यात आले आहे. पूजा व वैभवने ‘चल अब वहाँ’ या आपल्या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं होतं. तर भुषण बरोबर ती एका जाहिरातीत झळकली होती. दगडी चाळ या सिनेमाने ती प्रसिद्ध झाली. दरम्यान सध्या सुडोल बांधा, उंची आणि मनमोहक चेहऱ्याच्या पूजाचे लाखो चाहते आहेत.

पूजा क्षणभर विश्रांती, झकास,दगडी चाळ, भेटली तू पुन्हा,लपाछपी पोश्टर बॉईज २ अशा कितीतरी मराठी सिनेमात झळकली आहे. तसंच तिने बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं आहे. सध्या पूजा तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!