Latest Marathi News
Ganesh J GIF

‘सीमा सचिनला धोका देईल ती भारतात फक्त या साठी आलीय’

सीमा सचिनच्या प्यारवाली लव्ह स्टोरीत अनोखा ट्विस्ट, सोशल मिडीयात जोरदार चर्चा, सीमाने बदलला धर्म आता....

दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. भारत व पाकिस्तानातही सीमा हैदर ही चर्चेत आली आहे. पबजी खेळत असताना सीमा आणि सचिन यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता ती सचिनची पत्नी झाली आहे.
सीमा पाकिस्तानी नवरा गुलाम हैदर याला सोडून चार मुलांसह भारतात पळून आली. सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदरने तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. तर सीमाला परत न पाठवल्यास पाकिस्तानातील हिंदूंवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याचदरम्यान सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात सीमा सध्याचा पती सचिनला धोका देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्वतःला सीमा हैदरचा एक्स प्रियकर म्हणवणाऱ्या पाकिस्तानातील एका तरुणाने सीमा संदर्भात धक्कादायक दावे केले आहेत. या तरुणाने, सीमाचा भारतात येण्यामागील खरा उद्देश आणि पाकिस्तानला परतण्याची वेळही सांगितली आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणाने दावा केला आहे की, तो सीमाच्या दोन वर्षांपासून संपर्कात होता. पाकिस्तानातील एका यूट्यूब चॅनलने या तरुणाची मुलाखत दाखविली आहे. यात त्याने, सीमासोबत आपली मैत्री होती, आपण सीमाला भेटलोही आहोत. तसेच, आम्ही लग्न करण्याचेही ठरवले होते, सीमा क्रिकेटची चाहती आहे. तिचा भारतात पोहचण्याचा हेतू केवळ वर्ल्डकप २०२३ पाहणे आहे. वर्ल्डकप पाहिल्यानंतर, सीमा पुन्हा तिचा पती गुलाम हैदर कडे जाईल. असा दावा सीमाने केला आहे. दरम्यान सीमा आणि सचिनने आता लग्न केले आहे. लग्नानंतर तिने मुलांचीही नावं बदलली आहेत. तसंच, तिने हिंदू धर्माचे पालन करण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र, सीमा पाकिस्तानातून भारतात येताना तिने घरातून पैसे व सोने आणल्याचा आरोप केला जात आहे.

सीमा विरोधात अजून कोणताही पुरावा मिळाला नाही. यामुळे न्यायालयाने तिला सचिनसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. परंतु तपास संस्थांचे बारीक लक्ष तिच्यावर आहे. सीमा हैदरने आपले नाव तिने बदलून ठाकूर असे केले आहे. तसेच आपला आणि मुलांचा धर्मही तिने बदलून त्यांना हिंदू केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!