Latest Marathi News
Ganesh J GIF

त्या स्टेटसमुळे कोल्हापूरातील वातावरण चिघळले, दगडफेकीची घटना

पोलीसांकडुन लाठीचार्ज, इंटरनेट सेवाही बंद, या तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश, तिघेजण ताब्यात

कोल्हापूर दि ७(प्रतिनिधी)- राजर्षींच्या कोल्हापूरात सध्या तणावाचे वातावरण असून कोल्हापूरातील इंटरनेट सेवा उद्या पर्यंत बंद करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली. पण या आंदोलनात दगडफेकीची घटना घडली आहे.

कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त करत बंदची हाक दिली होती. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली होती. पण समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आंदोलन केले. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच आंदोलनादरम्यान, मटण मार्केट परिसरात दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या आंदोनानंतर कोल्हापूरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच दगडफेक प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कोणाचेही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत कारवाईचे आश्वासन दिले आहे. कोल्हापूरातील वातावरण तणावपर्ण पण नियंत्रणात आहे.

पोलिसांनी कोणत्याही अफवांना बळी पडून नका, असे आवाहन केले आहे. जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवरर देखील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात १९ जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळं पाचपेक्षा अधिका लोकांना एकत्र जमता येणार नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!