Latest Marathi News
Ganesh J GIF

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा मास्क सक्ती?

आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती, सज्जतेसाठी या तारखेला राबवणार माॅक ड्रील

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यात कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा मृत्यूदर १.८२% आहे. पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत कोरोना वाढत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सज्जतेसाठी १३ आणि १४ एप्रिल रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आता सातारा जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशात आता सक्रिय रुग्णांची संख्या २५ हजार ५८७ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालय सतर्क वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये ते राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क हे प्रभावी साधन आहे. मास्कमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होते. देशभरात वाढत असेलेले कोरोना रुग्ण पहाता पुन्हा एकदा देशात मास्क सक्तीची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण हा सौम्य प्रकारातील कोरोना असून त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तरीही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर १३-१४ एप्रिल रोजी राज्यात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.गेल्या २४ तासामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये १ हजार ३२३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या आकडेवारीतही झपाट्याने झालेली वाढ पाहून डब्लूएचओनेदेखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!