
बाॅलीवूडची ही अभिनेत्री जॉन सीनासोबत करणार स्क्रिन शेअर
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज, त्या वक्तव्यामुळे आली होती चर्चेत
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- देसी गर्ल प्रियंका चोप्राने बाॅलीवूडनंतर हाॅलीवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. पण त्याचबरोबर प्रियंका चोप्रा WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रियंकाने WWE चॅम्पियन जॉन सीनासोबत एक मोठा प्रोजेक्ट साईन केला आहे.
प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्याचबरोबर ती जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम करणार आहे. प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी ही अभिनेत्री भारतात आली आहे. रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या मालिकेच्या प्रीमियरमध्ये प्रियंकासह तिचा को-स्टार रिचर्ड मॅडेन होता. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्राने बॉलिवूडचं भयाण वास्तव सगळ्यांसमोर आणलं होतं. ती म्हणाली होती की, ‘बॉलिवूडमध्ये तिला हवं तसं काम मिळत मिळत होतं त्यामध्ये ती अजिबात खुश नव्हती. मी या इंडस्ट्रीतील राजकारणाला कंटाळले होते. मला या सगळ्यातून विश्रांतीची गरज होती. आणि मला जगाच्या दुसऱ्या बाजूला जाण्याची संधी मिळाली आणि मी ती घेतली.’ असा खुलासा तिने केला होता. पण प्रियांकाने बॉलिवूडबद्दल तिचं कटू सत्य सांगितल्यापासून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला पाठिंबा दिला आहे. कंगना राणौत, शेखर सुमन यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रियांकाला पाठिंबा देताना इंडस्ट्रीवर टीका केली आहे. कंगना रणौतने प्रियांकाच्या बाबतीत जे काही घडले त्यासाठी करण जोहरला जबाबदार धरले आहे.
बॉलिवूडपासून हॉलिवूड पर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. प्रियांका आता हॉलिवूडमध्ये सतत सक्रिय आहे. तिने ग्लोबल स्टार म्हणून ओळख मिळवली आहे. प्रियांकाला हॉलिवूडमध्ये चांगलं यश मिळत आहे.