Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीने चित्रपट समीक्षकाला धाडली कायदेशीर नोटीस

छेडछाडीचे आरोपाचा इन्कार, इन्स्टा पोस्ट करत म्हणाली ज्याने मला आणि माझ्या....

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाॅलीवूड बद्दल सतत उलटसुलट चर्चा प्रसिद्ध होत असतात. त्यात अभिनेत्री उर्वशी रौतेला रोजच चर्चेत असते. अनेकदा तिचे नाव वेगवेगळ्या क्रिकेटपटूंशीही जोडले जाते. सध्या ती वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. तिच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्यामुळे ती चिडली आहे.


उर्वशी रौतेलाने स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या उमेर संधूवर कायदेशीर कारवाई केली आहे. उमैर नेहमीच बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल खोटे आणि दिशाभूल करणारे अपडेट्स देत असतो. नुकतेच उमेरने उर्वशी आणि साऊथचा अभिनेता अखिल अकनिनेनी यांच्याबद्दल एक ट्विट केले होते, ज्यावर उर्वशीने आपला राग व्यक्त करत उमेरवर कायदेशीर कारवाई केली आहे. दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनीने उर्वशीला ‘एजंट’ या चित्रपटाच्या सेटवर त्रास दिल्याचं वृत्त उमैरने दिलं होतं. इतकंच नव्हे तर उर्वशीच्या मते अखिल हा बालिश कलाकार असून त्याच्यासोबत काम करताना अनेक अडचणी येत असल्याचेही पोस्टमध्ये लिहिलं होतं. यावर उर्वशी रौतेलाने पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या लीगल टीमने उमेर संधूला बदनामीची कायदेशीर नोटीस दिली आहे. उमैर सारख्या असभ्य पत्रकाराचा आणि तुमच्या खोट्या/ हास्यास्पद ट्विटचा मला खूप राग आला आहे. तुम्ही माझे अधिकृत प्रवक्ते नाही. उमैर संधू बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या ट्विटसाठीही ओळखला जातो. मात्र आता उर्वशीने उमेरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. ती त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि अखिल अक्किनेनी यांचा ‘एजंट’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचे बजेट १०० कोटींहून अधिक आहे. मध्यंतरी एजंट’च्या सेटवरून उर्वशी राैतेला आणि अखिल अक्किनेनीसोबतचे फोटो लीक झाले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!