Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

परदेशात शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती पुन्हा सुरू

पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने पुन्हा शिष्यवृत्ती सुरू केली आहे. त्यासाठी सुळे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत परदेशातील विद्यार्थ्यांची शिक्षण पूर्ण फी, आरोग्य विमा व व्हिसा शुल्कही मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु अनेकदा नवे वातावरण व अन्य काही कारणांमुळे मुलांना एटीकेटी मिळते. असे झाल्याने काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबविली होती.

परिणामी त्यांना तेथे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यवृत्ती पुन्हा बहाल केली आहे. ही अतिशय आनंदाची बाब असून यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शिक्षण आता पुन्हा व्यवस्थित होऊ शकेल हा विश्वास आहे, असे सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले असून सर्व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!