Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार नाही तर हे होणार नवे मुख्यमंत्री?

मुख्यमंत्रीपद अजित पवारांना देण्यास भाजपा नाखुश, मुख्यमंत्रीपदासाठी या दोन नेत्यामध्ये स्पर्धा, शिंदेचे काय होणार?

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रेसंबंधी विधानसभा अध्यक्षांना लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईवर आक्षेप घेतल्यानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे शिंदे सरकार अस्वस्थ आहे. पण भाजपाने मात्र आपला प्लॅन बी तयार ठेवला असल्याची चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे अपात्र ठरणार अशी भाजपाला खात्री असल्यामुळे अजित पवार यांना सत्तेत सामील करुन घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अजित पवार यांनी शपथ घेतल्यापासून होत आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असे बोलले जात होते. पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असतानाच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याच्या बातम्या झळकल्याशिवाय होत्या. त्याचबरोबर शरद पवार यांनी एनडीएमध्ये आणण्यात देखील अजित पवार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री करण्यास भाजपाचे हायकमांड उत्सुक नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजपा मुख्यमंत्री पद स्वतः घेणार असल्याची चर्चा आहे. यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. गडकरी हे आगामी काळात नरेंद्र मोदी यांना अवजड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना राज्यात पाठवणार असल्याची चर्चा आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी जेमतेम एक वर्षाचा कालावधी भेटणार असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या भरवशावर बंड केले होते. पण जर तेच अपात्र ठरले तर भाजप त्यांचे कशाप्रकारे पुनर्वनस करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर आता शिंदे गटात जेवढे आमदार आहेत. ते शिंदेसोबतच राहणार की परत ठाकरेंकडे जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान घटना तज्ञ पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार आणि दहाव्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरलार असल्याचे सांगत असल्यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्था आहे.

शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांबाबत सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या सुनावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावण्याची शक्यात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!