
‘एकनाथ शिंदे ‘इतक्या’ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते’
अशोक चव्हाणांचा गोप्यस्फोटानंतर शिवसेना नेत्याचा नवीन गाैप्यस्फोट
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भाजपाच्या आणि विशेष करुन फडणवीसांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत सापडले आहेत.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या समावेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.पण एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांबाबत शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना कळालं, त्यानंतर शिंदेंनी माघार घेतली. जे आज आम्हाला सांगतायेत काँग्रेससोबत गेले परंतु आज गद्दारी करणारे एकनाथ शिंदे स्वत: काँग्रेससोबत जाणार होते त्याचं काय? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेवर आरोप केला आहे.ते म्हणाले शिंदे किती वेळा खोटं बोलून उद्धव ठाकरेंवर आरोप करणार आहात? त्यांच्यामुळेच तुमची ओळख आहे.संजय शिससाट यांना देखील ही गोष्ट माहित आहे.आताची बंडखोरी हिंदुत्वासाठी नव्हे तर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी होई. शिंदेंना खुर्ची हवी होती असा आरोप खैरेंनी केला आहे. दसरा मेळाव्यावरही त्यांनी भाष्य केले आहे.
अशोक चव्हाण, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाण्यास तयार होते तसा प्रस्ताव दिल्याचा दावा केला आहे तर शिंदे गटाकडून खैरे हे उद्धव ठाकरेंचे ज्योतिषी आहेत असं सांगत त्यांचा दावा आमदार भरत गोगावले यांनी फेटाळून लावला आहे.