
राजकीय पक्षांवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
महाराष्ट्रातील पक्षांसह या राज्यातील पक्षाची मान्यता रद्द
दिल्ली दि १३ (प्रतिनिधी)- केंद्रिय निवडणूक आयोगाने भारतातील तब्बल ५३७ राजकीय पक्षांवर कारवाई केली आहे. प्रत्यक्षात पक्ष अस्तित्वात नसणे , पक्ष निष्क्रिय असणे अशा विविध कारणांखाली निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह बिहार, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू ,तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील राजकीय पक्षांचा समावेश आहे . २५ मेपासून निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने २५३ राजकीय पक्षांना निष्क्रिय घोषित केले आहे. महाराष्ट्रासह , बिहार , दिल्ली, कर्नाटक , तमिळनाडू , तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील स्थानिक निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार २५३ राजकीय पक्षांनी २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेत एकही निवडणूक लढवली नव्हती. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अठींची पूर्तता करण्यास हे पक्ष अपयशी ठरल्याने २५३ पक्षांना निष्क्रिय ठरवण्यात आले आहे. राजकीय पक्षाची नोंदणी केल्यानंतर त्या पक्षाने पुढील पाच वर्षात एकतरी निवडणूक लढवणं गरजेचं आहे. जर, सलग सहा वर्षे पक्षाने कोणतीही निवडणूक लढवली नाही तर, तो पक्ष यादीतून रद्द केला जातो.
नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागानेही काही दिवसांपूर्वी काही केली होती. अनधिकृत फंडिंग केल्याप्रकरणी करवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानेच प्राप्तीकर विभागाला दिल्या होत्या. या राजकीय पक्षांवर करचोरीचाही आरोप करण्यात आला होता.