Latest Marathi News
Ganesh J GIF

निवडणूक ग्रामपंचायतीची धमकी ओमराजे निंबाळकरांना मारण्याची

उमेदवाराच्या घरावर चिकटवलं धमकीचं पत्र, तुळजापूरातील गावात तणाव

उस्मानाबाद दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात उमेदवारा अर्ज मागे घेण्याची धमकी देत खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातील उमेदवार कांताबाई साळवे यांच्या नावाने धमकीचे पत्र चिकटवण्यात आले आहे. कांताबाई राष्ट्रवादी किसान सेल प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांच्या आई आहेत धमकीच्या पत्रात “ज्ञानेश्वर साळवे मदत कर मतदानातून माघार घे. शेवट पाठिंबा दे, नाही तर गावात रहायचे अवघड होईल. तुझा खासदार ओम बाळ, तुझा कलेक्टर आणि तुला नाही तर बघून घेवू. वेळ आली तर संपवून टाकू. वेळ आली तर तुला पण संपवून टाकू. तुला कोण मतदान करतंय आम्ही बघतो. तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरला परिणाम भोगावे लागतील. लई दलित समाजावर उडया मारतोय काय? अशी धमकी देण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या धमकीवरून अप्रत्यक्षपणे आमदार राणाजगजितसिंहवर निशाना साधला आहे. तर राष्ट्रवादीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. सर्व पक्षीय स्थानिक विकास आघाडीकडून रामेश्वर वैद्य हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. तर ११ पैकी ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ४ उमेदवारांसाठी निवडणूक होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!