Latest Marathi News

ग्रामपंचायत विजयासाठी विरोधी पॅनलवर भानामतीचा प्रकार

निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेला खतपाणी, सांगलीत काय सुरु आहे

सांगली दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. गावाची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात निवडून येण्यासाठी जादुटोणा – भानामतीचा आधार घेवू लागले आहेत.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणाकाठी असलेल्या कनेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी आता अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. कोणीतरी दुरडीत केळी, कापड पीस, बाहुल्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकून हे साहित्य कणेगावच्या चौका चौकात मंगळवारी, बुधवारी मध्यरात्री ठेवले होते. वाळवा तालुक्यातील कनेगाव येथील मारूती चौक, हायस्कूल चौक, भरतवाडी रोड, नवीन गावठाण वसाहत अशा प्रत्येक ठिकाणी अशा भानमतीच्या दुरड्या लोकांचे लक्ष वेधत आहेत. तर खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथे ही भानामतीचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू आढळून आले आहे. या घटनेने परिसरात विविध चर्चा रंगू लागली आहे.तर जत तालुक्यातील काशिलिंगवाडी येथील जिल्हास्तरीय आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित या गावच्या ग्रा.पं. निवडणूकीत काळ्या जादूचा प्रयोगही सुरू आहे.

सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जिल्ह्यातील १० तालुक्यामधील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत आहेत. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भानामतीचा प्रकार झाल्याची गावात सध्या चर्चा सुरू आहे.निवडणुकीतील प्रचारापेक्षा या भानामतीच्या प्रकाराची चर्चा अधिक रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!