Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे फडणवीसांच्या संपर्कात तब्बल इतके आमदार

त्या नाराज आमदारांनी वेगळी भुमिका घेतल्यास सरकारची खेळी?

मुंबई दि १६ (प्रतिनिधी) – शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी वर्षातही आमदार पळवापळवी सुरूच राहणार असल्याची चर्चा आहे.

उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “१० ते १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत.जरी सरकार पाडण्याच्या किंवा निवडणुका लागण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या असल्या, तरी मी असं सांगितलं होतं की १७० हा आमचा बहुमताचा आकडा आहे. आणखीन १० ते १२ लोक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा १८० ते १८२ पर्यंत जाऊ शकतो. नवीन वर्षांत तुम्हाला नव्या घडामोडी काय आहेत ते कळेल”, असे म्हणत महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. त्याचबरोबर “खरा धमाका पाच महिन्यांपूर्वी झाला. त्याचे पडसाद नवीन वर्षात उमटतील”, असे म्हणत आमदारांच्या बंडखोरीचे समर्थन केले आहे. शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत त्यांनी एैनवेळी वेगळी भुमिका घेतली तर या संपर्कातील आमदारांना गळाला लावले जाण्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

उद्धव ठाकरे वेगवेगळ्या समाजघटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करून पक्षबांधणीसाठी काम करत आहेत. त्यातच उदय सामंत यांचा दावा ग्राह्य धरल्यास ठाकरेंकडचे सर्वच आमदार शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेतील ११ उमेदवारांचा शिंदे गटातील प्रवेश हा त्याची सुरुवात असल्याची चर्चा रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!