
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजन, विजेत्यांना मिळणार पारितोषिक
बार्शी दि २(प्रतिनिधी) – विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक १३ एप्रिल रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह बार्शी या ठिकाणी करण्यात आले आहे. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व वक्त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यांना खालील प्रमाणे अनुक्रमे, प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व संविधान प्रत, द्वितीय पारितोषिक 15 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व संविधान प्रत, तृतीय बक्षीस 10 हजार 132 रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व संविधान प्रत, उत्तेजनार्थ पारितोषिक 5 हजार 132 रुपये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व संविधान प्रत, अश्याप्रकारची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असून, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरील वक्तृत्व स्पर्धा खुल्या गटामध्ये होणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी दिनांक 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान, स्पर्धेचे आयोजक धिरज शेळके 9922914009, प्रवीण भडके 9822703305, अजय कांबळे 8805261864 या क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे, क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धिरज शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.