पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या सरपंचाची भररस्त्यात हत्या
हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, हल्लेखोरांबाबत महत्वाची अपसेट समोर, बघा काय घडल?
पुणे दि २(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर खूनी हल्ला झाला असून यातव त्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायत ते बिनविरोध निवडून आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिरगाव येथील प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड झाली होती. शनिवारी रात्री साईबाबांच्या मंदिरासमोर मित्रांसोबत थांबलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रवीण गोपाळे हे गंभीर जखमी झाले होते. ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. तेव्हा त्यांना काही अंतरावर गाठून त्यांच्यावर कोयत्याने वार करून ठार मारण्यात आले. गोपाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मावळ परिसरात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाने चार संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, नेमकं कारण तपासाअंती समोरील येईल. पण हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. काही महिन्यांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूकीत प्रवीण गोपाळे हे सरपंच पदी निवडून झाले होते. केवळ २५ सेकंदात गोपाळे यांची हत्या करुन आरोपींनी पळ काढला.