Latest Marathi News
Ganesh J GIF

खासदार अमोल कोल्हे अमृता खानविलकर बरोबर करणार लग्न

शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता

पुणे दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रावादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नेहमी अभिनय आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. मात्र, नुकतीच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. नुकताच त्यांनी एका वृत्तवाहिनीमधील बातमीचा फोटो शेअर केला आहे. या बातमीची हेडलाइन “अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?” असे कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच संपूर्ण बातमी ही अमृता आणि अमोल यांच्या लग्नाविषयी लिहिण्यात आली आहे.
अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या बातमीत, “डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेत्री अमृता खानविलकरच्या प्रेमात पडले आहेत आणि लवकरच ते तिच्याशी लग्न करणार आहेत. इतकंच नव्हे तर अमृता हे नाव त्यांच्यासाठी लकी आहे आणि तिच्यासोबत लग्न केल्यामुळे ते उपमुख्यमंत्री होऊ शकतील” असे स्वत: अमोल कोल्हे बोलले असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे.अमोल कोल्हे यांनी ही बातमी इन्स्टाग्रामवर शेअर करताना “हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!” असे हटके कॅप्शन दिले आहे.

अमोल कोल्हे यांनी एमबीबीएसची डिग्री मिळाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी केईएम रुग्णालयात सराव सुरू केला. या दरम्यान त्यांचा परिचय डॉक्टर अश्विनी यांच्याशी झाला आणि पुढील वर्षांमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांची पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. अमोल कोल्हे यांना आध्या व रुद्रा अशी दोन मुले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!