मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राज्यातील नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीकडे अनेक तरुणांचे लक्ष लागले होते. पण नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेली महापोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सरकारला कदाचित तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पोलीस शिपाई संवर्गातील ही भरती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. या भरतीची पुढच्या आठवड्यात नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.पोलीस भरतीबरोबर राज्य राखीव दलाची ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. १४ हजाराहुन अधिक जागांसाठी ही पोलीस भरती होणार होती. त्यासाठी १ नोव्हेंबरला जाहिरात प्रसिध्द केली जाईल असेही सांगण्यात आले होते त्यामुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह होता.पण आता त्याला स्थितीती देण्यात आल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. कोरोना काळापासून पोलीस भरतीच्या आश्वासनाशिवाय तरुणांच्या हाती काहीच लागलेले नाही.सध्यातरी सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे.
कुणावरही अन्याय होऊ नये म्हणून ही भरती पुढे ढकलली आहे. मागील तीन वर्षांपासून भरती झाली नव्हती. तसचे काही जणांना वयोमर्यादेमुळे भरती प्रक्रियेला मुकावे लागू नये म्हणून भरती प्रक्रिया पुढे ढकलली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भरतीची पुढच्या आठवड्यात नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.