Just another WordPress site

आयसीयुत घुसून रुग्णावर केले जादूटोण्याने अघोरी उपचार

सांगलीत खासगी रुग्णालयात धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

सांगली दि २३(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यामधील आटपाडी तालुक्यामध्ये एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातीमध्ये असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्रतंत्र म्हणत जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता. हा सर्व प्रकार रुग्णालयात सुरू असताना डॉक्टरांनी विरोध केला म्हणून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

संपतराव नामदेव धनवडे यांनी आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे. तसेच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही सर्व प्रकार चित्रीत झाला आहे.मंत्रतंत्र आणि जादूटोणाच्या कृत्यास वरद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुज्जत घालण्यात आली. याप्रकरणी संजय गेळे आणि अश्विनी संजय गेळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओमधून अंधश्रद्धा भोंदूगिरीचा प्रकार दिसून आला आहे. असे प्रकार सामाजिकदृष्ट्या अत्यंत घातक आहेत. संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे.

GIF Advt

राज्यात एकीकडे जनजागृती करण्यासाठी विविध संस्था जादूटोणा, अंधश्रद्धा, बळी, अशा प्रथा परंपरा बंद करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. अथक प्रयत्न करूनही सर्रासपणे असे प्रकार दिसून येतात. सर्रासपणे अंधश्रद्धा पाळल्याचे दिसून येतात. सांगलीत हा प्रकार दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!