Just another WordPress site

लग्नाचा तगादा लावल्याने प्रेयसीसोबत प्रियकराचे धक्कादायक कृत्य

पनवेलमधले गूढ एका चपलेने सुटले, प्रियकरासह मित्राला पोलीसांच्या बेड्या

रायगड दि २३(प्रतिनिधी)- पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलं आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. नवी मुंबई गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.

GIF Advt

गुन्हे शाखेने या प्रकरणात रियाज समद खान व त्याचा मित्र इम्रान इस्माईल शेख या दोघांना अटक केली आहे. उर्वशी सत्यनारायण वैष्णव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रियाज हा घणसोलीत जिम ट्रेनर म्हणून, तर त्याचा मित्र इम्रान हा कुरीयर डिलीव्हरीचे काम करत होता. तर मृत उर्वशी बार मध्ये काम करत होती. रियाज आणि उर्वशीमध्ये प्रेम संबंध होते. मागील काही दिवसापासून उर्वशीने रियाजच्या पाठीमागे लग्नासाठी हट्ट धरला होता, मात्र रियाजला तिच्यासोबत लग्न करायचे नसल्यामुळे त्याने तिला कायमचे संपून टाकण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने आपला मित्र इम्रानची मदत घेतली. घटनेच्या दिवशी रियाजने उर्वशीची दाव्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर धामणी गावच्या हद्दीतील गाढी नदीच्या पात्रात तिचा मृतदेह टाकत त्याची विल्हेवाट लावली. दुस-यादिवशी तिचा मृतदेह वर आल्यानंतर पोलीसांनी ओळख पटवत तपासाला सुरुवात केली.

पोलीसांकडे कुठलाही पुरावा नसताना या तपासात पोलिसांना उर्वशीने ज्या दुकानातून चप्पल खरेदी केली होती, त्या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज मिळाले. त्यावरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली. त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनवण्यात आली आहे. आरोपीचे अजून कुठे प्रेम संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.त्याचा अधिक तपास सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!